‘माहितीदूत’ उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ युवकांनी माहितीदूत उपक्रमात सहभागी व्हावे- ना. चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘युवा माहिती दूत’ या अभिनव उपक्रमाचा रायगड जिल्ह्यात  राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील महाविद्यालयातील युवक युवतींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी ना. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.
 यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा न्यायाधीश सेवतीकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीधर बोधे, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या सह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी ना. चव्हाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोगोचे अनावरण करुन माहितीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
माहितीदूत उपक्रमः-
शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲप वर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणाऱ्या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत. 15 ऑगस्ट नंतर सहा महिन्याच्या कालावधीत माहितीदूतांनी 50 कुटुंबाशी समक्ष संपर्क साधून त्यांना विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या ॲपवर कुटुंबाशी भेट दिलेल्या बाबतची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला जाणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी, रायगड हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत.  इच्छुक व्यक्तींनी यावे तसेच माहिती दूत म्हणून उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02141-222019 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज