माजी सैनिक पाल्यांसाठी के.एस.बी. आर्थिक मदत: ऑनलाईन अर्ज भरतांना घ्यावयाची दक्षता



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी के एस बी नवी दिल्ली साठी आर्थीक मदत मिळते. त्यासाठी फॉर्म भरताना सेवा पुस्तक, शैक्षणिक दस्तावेज, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, माजी सेनिक ओळखपत्र, पाल्याचे गुणपत्रक, पीपीओ इतर दस्तावेजाचा आधार घेऊन योग्य ती माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये भरावी. स्कॅन कॉपी अपलोड करताना मुळ प्रतीची स्कॅन कॉपी अपलोड करावी  झेरॉक्सची स्कॅन कॉपी अपलोड करू नये. आधार कार्ड, माजी सैनिक ओळखपत्राची पाठपोठ स्कॅन कॉपी अपलोड करावी. सेवापुस्तकाची पुर्ण पाणांच्या प्रती अपलोड कराव्यात. फॉर्म मध्ये गत वर्षी पास झालेल्या इयत्तेची नोंदीची खात्री करून, पाल्य पास झाल्याची गुणपत्रीकेवर नोंद असावी. नुतनीकरणाच्या प्रकरणांचे  वेळेत नुतनीकरण करावे. के एस बी साठी ऑनलाईन  फॉर्म भरलेनंतर अपलोड दस्तावेजांच्या सर्व प्रती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रायगड-अलिबाग येथे सादर कराव्यात जेनेकरून प्रकरणांची निट पडताळणी करून योग्य प्रकारे भरलेला फॉर्म के एस बी ला सादर   करणेस या कार्यालयास मदत होईल माजी सैनिक/माजी सैनिक विधवांचे आर्थिक नुकसान होणार नाही. आधिक माहितीसाठी के एस बी साई www.ksb.govt.in कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02141-222208 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज