लोकराज्य वाचक अभियान : पनवेल येथील ठाकुर विधी महाविद्यालयात आज लोकराज्य वाचक मेळावा : सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.11- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ पनवेल येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकुर विधी महाविद्यालय येथे बुधवार दि.12 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दरमहा प्रकाशित होणारे ‘लोकराज्य’ हे मासिक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी  सध्या ‘लोकराज्य वाचक अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ पनवेल येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकुर विधी महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात, बुधवार दि.12 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर यांच्या हस्ते या अभियानाचा  शुभारंभ होणार आहे. या वेळी कोकण विभागाचे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे हे ही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वाचकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शितला गावंड आणि रायगड जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत