जागतिक मानसिक आरोग्य कार्यक्रम : मानसिक आरोग्य प्राधान्याने जपा- डॉ.अजित गवळी



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.11- मानसिक आरोग्य उत्तम असेल तर शारिरीक आरोग्य ही उत्तम राखता येते. त्यामुळे मानसिक आरोग्यास प्रत्येकाने प्राध्यान्याने जपावे. मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती आढळल्यास त्यास जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार कक्षात आणावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी  यांनी सोमवारी (दि.10) येथे केले.
 जागतिक मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत  जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवार दि.10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत आत्महत्या प्रतिबंधक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग विद्यार्थिनींनी प्रभात फेरी काढून केले. यावेळी डॉ. गवळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.  यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे, भिषक तज्ज्ञ डॉ. राजीव तांबाळे तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. अमोल भुसारे यांनी मानसिक आजार, त्याची लक्षणे, घ्यावयाची काळजी, तसेच त्यावर उपलब्ध उपचार सुविधा याबाबत  उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे खोली क्रमांक 22 येथे ही उपचार सुविधा मोफत उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक मनोसामाजिक कार्यकर्त्या श्रीमती धनजी गोयर यांनी केले. या सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. विशाल दामोदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत