जागतिक अंडी दिवस जिल्ह्यात 52 हजार अंडी वाटप



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20-  जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी जागतिक अंडी दिन (दि.१२) साजरा करण्यात आला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमातून ५२ हजार अंड्यांचे वाटप करण्यात आले व अंड्यांचे आहारातील महत्त्व पटवून देण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये आदिवासी आश्रमशाळा, आदिवासी पाड्यातील शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, आदिवासीपाडा पंचायत समिती सर्व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, राज्यस्तरीय व जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 येथील कार्यक्षेत्रात लोकसहभागातून व अंडी निर्माण करणाऱ्या कुक्कटपालन व्यावसायिकांच्या सहकार्याने 52 हजार अंड्याचे वाटप करण्यात आले.  अंडे हे निसर्ग निर्मित अन्न आहे.  अंड्यामध्ये शरीराची जडणघडण करणारी प्रथीने आणि नऊ अत्यावश्यक अमिनो ॲसिडस आहेत.  मानवी शरीरासाठी आवश्यक असलेल्या प्रथीने, जीवनसत्वे, खनिजे व स्निग्ध पदार्थ या पोषणमूल्यांचे संतुलित प्रमाण अंड्यांमध्ये असते.   साधारण आकाराच्या कोंबडीच्या अंड्यापासून सरासरी 66 किलो कॅलरी एवढी उर्जा मिळते व ती मानवी आहारात लागणाऱ्या सरासरी उर्जेच्या तीन टक्के असते. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या शिफारशीनुसार प्रतिवर्षी माणसी 180 अंड्याची आवश्यकता आहे. राज्याचे वार्षिक अंडी उत्पादन 547.83 कोटी इतके आहे.  राज्यात अजूनही अंडी उत्पादन व कुक्कुट पालन व्यवसायास फार मोठा वाव आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयध्ये मान्यवरांच्या हस्ते जागतिक अंडी दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  या कार्यक्रमाकरिता जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, व जिल्ह्यातील कार्यरत सर्व पशुधन विकास अधिकारी विस्तार व दवाखाना तसेच पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 येथील कार्यरत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांनी लोक सहभागातून अंड्याचे वाटप केले.  गावस्तरापर्यंत जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज