वाहन व पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव 13 नोव्हेंबर रोजी
अलिबाग,
जि. रायगड, दि.2 (जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण
तसेच जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, बसस्थानक येथे अनेक वर्षांपासून वाहने कर व दंड न भरल्यामुळे आणि इतर कारणासाठी अटकावून ठेवलेली आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियम 1966 अन्वये नोंदणी प्राधिकाऱ्यांना
असलेल्या अधिकारात नोटीस जाहिर करण्यात येत आहे. वाहन मालकांना, ताबेदाराना, वित्तदात्यांना
जाहिररित्या कर व दंड भरुन वाहने सोडवून नेण्यासाठी अवगत केले आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी मोटार वाहन मालकांना, ताबेदाराना,
वित्तदात्यांना आवाहन करुनही मोटार वाहन मालक कर दंड भरण्यासाठी हजर झाले
नाहीत. परिणामी वाहने खराब होत आहेत.
त्यामुळे शासनाचाही महसूल वसूल होत नाही.
वायुवेग पथकांनी वेळोवेळी अटकावून वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या
नोंदणीकृत पत्यावर पोचदेय डाकेने नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार वाहन
मालकांनी पत्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असताना देखील सदर
वाहनांच्या मालकांनी या कार्यालयास तसे कळविलेले नाही. वाहन मालकांना, ताबेदाराना, वित्तदात्यांनी
लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर व दंडाच्या रकमेचा भरणा करुन वाहने
सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दि. 5 नोव्हेंबर पर्यंत लेखी
हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा
लिलाव 13 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत करण्यात येईल. तद्नंतर वाहन मालकाची कोणतीही तक्रार, दावा
याची दखल घेतली जाणार नाही. सदर वाहने
सोडवून नेण्याची ही अंतिम संधी असेल.
जाहिर लिलाव करावयाच्या वाहनांचे ठिकाण, लिलावाच्या अटी व शर्ती या
कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर 5 नोव्हेंबर पासून प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे
अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी स्वत:कडे
राखून ठेवले आहेत. लिलावात ज्यांना भाग घ्यावयाचा
आहे त्यांनी रुपये पंचवीस हजारचा राष्ट्रीयकृत बँकेचा उप प्रादेशिक परिहवन
अधिकारी, पेण यांचे नावाचा धनाकर्ष (डीडी) दि. 13 नोव्हेंबर पर्यंत दुपारी
वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. जाहिर
लिलावाचे स्थळ: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे असून दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यावेळेत
लिलाव होणार आहे असे श्रीमती उर्मिला पवार, उप प्रादेशिक परिहवन अधिकारी पेणे यांनी
कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment