वाहन योग्यता प्रमाणपत्र आता 4.0 प्रणालीवर
अलिबाग,जि.रायगड,दि.5(जिमाका)- परिवहन संवर्गातील सर्व वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व अन्य सर्व
कामकाजासाठी परिवहन विभागात 1 जानेवारी 2019 पासून ऑनलाईन वाहन 4.0 या प्रणालीचा
वापर करण्यात येणार आहे. तरी सर्व वाहनधारकांनी आपल्या हस्तलिखित परवाने व अन्य
नोंदींची कागदपत्रे सादर करुन सर्व नोंदी ऑनलाईन प्रणाली 4.0 वर करावी, असे आवाहन
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी केले आहे. परिवहन संवर्गातील ‘हस्तलिखित अभिलेख’ असलेल्या सर्व वाहनधारकांनी (
ऑटोरिक्षासह) त्यांच्या वाहनाच्या योग्यता
प्रमाणपत्र नूतनीकरण व वाहनाच्या अन्य कामकाजासाठी प्रथम उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे
येऊन वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सादर करावी व 4.0 प्रणालीवर आपल्या वाहनाची नोंद
करुन घ्यावी. ही नोंद झाल्यानंतर कामकाजासाठी आवश्यक शुल्क व करवाहन 4.0 प्रणालीवर
स्विकारण्यात येणार आहे. तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणीसाठीही रितसर आगाऊ
वेळ घ्यावी, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment