महिला केंद्रीत आरोग्य-उपचार व्यवस्थेसाठी शासन कटीबद्ध- आरोग्यमंत्री ना. डॉ.सावंत
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.1- कुटूंब व्यवस्था ही आपल्या देशाचा कणा आहे आणि महिला
ही कुटूंब व्यवस्थेचा कणा आहे. महिलेचे आरोग्य उत्तम असेल तर पूर्ण कुटूंबाचे आरोग्य
उत्तम असेल. म्हणून महाराष्ट्र शासनाने महिला केंद्रीत आरोग्य व उपचार व्यवस्थेची
निर्मिती करण्यासाठी पावले उचलली असून त्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन
राज्याचे आरोग्य मंत्री ना. डॉ. दीपक सावंत यांनी आज पनवेल येथे केले.
पनवेल येथे पनवेल महानगरपालिका आणि प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांच्या संयुक्त
विद्यमाने ‘एक पाऊल कर्करोग मुक्तीकडे’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी ना. डॉ. सावंत बोलत होते.
पनवेल च्या आद्यक्रांतीवीर वासुदेव
बळवंत फडके नाट्यगृहात आज सकाळी या अभियानाचे ना. डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
झाले. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमल, राज्याच्या आरोग्य
विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश
ठाकूर, महिला बालकल्याण सभापती लीना गरड, मनपा
आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संध्या बावनकुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, अजित गवळी, वैद्यकीय
अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, ड्पे. गुणे, राजयोगिनी
ब्रह्मकुमारीज संतोषदीदी आदी मान्यवर
उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी मार्गदर्शन करतांना
डॉ. सावंत म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे
लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळेच त्या कुटूंब निरोगी राखू शकता. शासनाच्याआरोग्य
विषयक विविध योजना ग्रामिण भागापर्यंत पोहोचण्यासाठी
शासन प्रयत्नशील आहे. महिलांनी या
योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे व कुटूंबाचे आरोग्य चांगले राखावे, असे आवाहन त्यांनी
यावेळी केले. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमल,
निल हॉस्पिटलच्या डॉ. शुभदा नील, डॉ. गिरीष
यांनी मार्गदर्शन केले. तर कर्करोग मुक्त
भारत, गर्भाशय पिशवीच्या मुखाचा आणि स्तनाचा कर्करोग या विषयावर डॉ. निखिल पर्वते यांनी मार्गदर्शन केले. या
कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
00000
Comments
Post a Comment