हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी; जिल्हा पोलीस दलाचे ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’


        अलिबाग,जि.रायगड,दि.5(जिमाका)- हरविलेल्या/पळवुन नेलेल्या 18 वर्षाखालील मुले मुलींच्या शोध घेण्यासाठी रायगड पोलीसांमार्फत ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र ही मोहीम संपूर्ण डिसेंबर महिन्यात रायगड जिल्ह्यात सर्व पेालीस ठाण्यांच्या हद्दीत राबविली जात आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी आपल्या जवळपासच्या परिसरातील बेवारस मुलांबाबत माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’ नियंत्रण कक्ष पोलीस अधिक्षक कार्यालय, अलिबाग जि. रायगड येथे कळवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे.
            रायगड जिल्ह्यात सन 2000 ते 2018 या कालावधीत एकुण 23 बालके हरविलेली असुन ती अद्याप पर्यंत मिळुन आलेली नाहीत. या बालकांचा शोध या मोहिमेत घेण्यात येणार आहे.  त्यासाठी इतर जिल्हे व राज्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या हरविलेल्या बालकांचा शोध लावून त्यांना  त्यांच्या आई वडीलांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
            ही मोहीम राबविताना जी मुले/मुली निवारा निवासस्थाने, रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्ते, धार्मिक स्थळे, हॉटेल, धाबे, कारखाने येथे काम करणारी बालके, भिक मागणारी बालके, कचरा गोळा करणारी बालके, इत्यादींची पोलीसांकडुन डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी दरम्यान बेवारस आढळलेल्या आलेल्या मुलांची मिसिंग रजिस्टर मध्ये नोंद घेत्यांचे फोटो व व्हीडीओग्राफी करून ही माहीती पोलीस यंत्रणा संकलित करून राज्य शासनाच्या संकेतस्थळावर व प्रसारमाध्यमाव्दारे प्रसारीत केली जाईल. या उपक्रमासाठी जनतेने अधिकाधिक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात बेवारस बालके आढळुन आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्या अथवा रायगड जिल्हा ऑपरेशन मुस्कान संपर्क क्रमांक-नियंयण कक्ष 02141-222100 यावर संपर्क साधून माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे. या अभियानात जास्तीत जास्त बेवारस बालकांचा शोध घेउत्तम कामगिरी करणारे पोलीस व मदत करणारे नागरिक यांना गौरविण्यात येणार आहे, असे  रायगड जिल्हा पोलीस दलाने कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज