एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त पथनाट्यस्पर्धाः केळुस्कर होमिओपॅथी कॉलेज प्रथम, पीएनपी द्वितीय तर जा.र.ह.कन्या शाळा तृतीय
अलिबाग,जि.रायगड,दि.5(जिमाका)- जागतिक एड्स नियंत्रण दिन व जनजागृती सप्ताहनिमित्त मंगळवार (दि.4)रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे
आयोजित पथनाट्य स्पर्धेत अलिबाग येथील चंद्रकांत हरी केळुसकर होमिओपॅथिक कॉलेजच्या संघाने प्रथम
पारितोषिक, तर पीएनपी कॉलेज, वेश्वी ता. अलिबाग यांच्या संघाने व्दितीय तर जा.र.ह. कन्याशाळा, अलिबाग या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.
जागतिक एड्स नियंत्रण दिन व सप्ताहनिमित्त मंगळवारी जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे आयोजित पथनाट्य
स्पर्धेचे उदघाटन जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, रायगड जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण सचिव जयदीप मोहिते (दिवाणी न्यायाधीश), मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा समनव्यक प्रा. डॉ. बाबासाहेब बिडवे लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष ला.श्री.
विजय वनगे, पीएनपी कॉलेज प्राचार्य सौ. संजीवनी नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
करून करण्यात आले.
यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा कार्यक्रमव व्यवस्थापक संजय माने, ॲड.कला पाटील, प्रा.
देवेंद्र केळुसकर, प्रा. रवींद्र पाटील, एरिया को-ऑर्डीनेटर एनएसएस सेल युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, प्रा. श्वेता गुरव, कार्यक्रम अधिकारी
एनएसएस, डॉ. दिनेश चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता अधिकांत पाटील, शशिकांत शिरसाट.
माधव शेंडे, डॉ. आदिती साष्टे, डॉ. स्वाती विरकुड, श्रीम
तपस्वी गोंधळी, श्री. सुशील साईकर आदी
मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी यांनी एचआयव्ही प्रतिबंधाची उपस्थितांना शपथ दिली. त्यानंतर रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
सचिव जयदीप मोहिते (दिवाणी न्यायाधीश) यांनी तंबाखू विरोधी शपथ दिली. या स्पर्धेमध्ये पीएनपी कॉलेज वेश्वी, चं.ह. केळुसकर होमिओपॅथिक
कॉलेज अलिबाग, जा.र.ह. कन्याशाळा, अलिबाग येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग
घेतला. तसेच यावेळी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा समनव्यक प्रा. डॉ.
बाबासाहेब बिडवे ,हर्षद घरत, प्राचार्य सौ. संजीवनी नाईक यांनी मार्गदर्शन
केले.
तसेच लवेंद्र मोकल, एड्स
जनजागृती मंडळ, कळवे यांनी एचआयव्ही एड्स विषयी लोककलेच्या (गाण्याच्या) माध्यमातून माहिती दिली.
या पथनाट्य स्पर्धेच्या
निकालाअंती चंद्रकान्त
हरी केळुसकर होमिओपॅथिक कॉलेज अलिबाग यांच्या संघास प्रथम पारितोषिक (रोख रु.
१५००/-), पीएनपी कॉलेज वेश्वी यांच्या
संघास व्दितीय पारितोषिक (रोख रु. १०००/-) व जा.र.ह. कन्याशाळा, अलिबाग यांच्या
संघास तृतीय पारितोषिक (रोख रु. ५००/-) देण्यात आले. लायन्स क्लब श्रीबाग
यांच्यावतीने विजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच पीएनपी कॉलेज वेश्वी यांस रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
सचिव जयदीप मोहिते (दिवाणी न्यायाधीश), ॲड. निहा राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सदर
पथनाट्याच्या परीक्षणाकरिता ॲड.कला पाटील, प्रा. देवेंद्र केळुसकर यांनी परीक्षक
म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील पर्यवेक्षक नवनाथ लबडे, रवींद्र कदमरश्मी सुंकले, संपदा मळेकर, राजकुमार बिराजदार, गणेश सुतार, सुरेशवाळंज, वाहनचालक किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील यांनी विशेष परिश्रम
घेतले.
Comments
Post a Comment