‘रायगड ई-बुक’ चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, दि.8- रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती
पर्यटकांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती
कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या ‘रायगडःपर्यटन विविधा’, या ई-बुकचे राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या
सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही उद्घाटन करण्यात आले.
मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात समिती सभागृहात हा
कार्यक्रम आज पार पडला.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, पर्यटन
राज्यमंत्री ना. मदन येरावार,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल
जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई
पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे ई- पुस्तक महाजालकावर www.raigadtourism.comयेथे तसेच मराठी ई- पुस्तकांच्या सर्व दालनांवर उपलब्ध
असेल. तसेच रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळwww.raigad.nic.inयेथेही या ई- बुकची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. तर मोबाईल
ॲप मध्ये पर्यटन स्थळे, निवास, भोजन सुविधा, मार्ग, नकाशे, वाहन सुविधा आदींबाबत
सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे
पर्यटन सुकर होण्यास मदत होणार आहे.
या पुस्तकात रायगड जिल्ह्यातील लेणी, गड- किल्ले, ऐतिहासिक
पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, समुद्र
किनारे, साहसी पर्यटन, धबधबे आदी समग्र पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्यात
आली आहे.
श्री. फडणवीस यांनी जगभरातील मराठी वाचकांना रायगड
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणाऱ्याया उपक्रमाचे कौतूक केले.
०००००
Comments
Post a Comment