अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवा- उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर

  
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- शासन अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवित असून या योजना अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचवाव्यात, असे प्रतिपादन अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर  यांनी आज येथे केले.  शासकीय विश्रामगृह अलिबाग येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मागदर्शन करताना श्री.अभ्यंकर म्हणाले की, जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी शासन अनेक नाविण्यपूर्ण योजना राबवित असते. या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली पाहिजे.   या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.  यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी आपल्या असलेल्या समस्यांची निवेदन दिली ती स्वीकारुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, शिक्षणाधिकारी श्रीमती दराडे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज