पेण येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा आरक्षण दाखले वितरण
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि. 7 – पेण येथील उपविभागीय कार्यालयातर्फे आयोजित
कार्यक्रमात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा
आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण
यांच्या हस्ते मराठा समाज आरक्षण दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, पेणचे आमदार
धैर्यशील पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, पेणच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा
पुदलवाड, तहसिलदार अजय पाटणे, मिलिंद पाटील, शरद कदम, वैकूंठ पाटील, गंगाधर पाटील, बंडू खंडागळे, हिमांशु कोठारी, प्रविण बैकर, संदीप पाटील, ललित पाटील आदी उपस्थित
होते.
यावेळी ना. चव्हाण म्हणाले की, हे शासन लोकांच्या हितासाठी काम करीत असून लोक हिताचे निर्णय घेऊन समाजातल्या शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या
लोकांना न्याय देत आहे. मराठा समाजातील लोकांना हे दाखले मिळण्यात काही अडचण येत
असल्यास नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहनही
त्यांनी यावेळी केले.
00000

Comments
Post a Comment