“सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा” बांधकाम कामगारांसाठी लाभ वाटप सोहळा आज
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.09:- महाराष्ट्र इमारत व इतर
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदित बांधकाम लाभ वाटप सोहळा कार्यक्रम गुरुवार दि.10 जानेवारी रोजी फोर कोर्ट एरिया,
खांदेश्वर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर, नविन पनवेल येथे राज्याचे कामगार, कौशल्य
विकास व उद्योजकता कामगार, भूकंप पुनर्वसन माजी सैनिकांचे कल्याण मंत्री
ना.संभाजीराव निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
लाभ वाटप सोहळा
या लाभ वाटप सोहळ्याचे उद्घाटन गुरुवार दि.10 रोजी सकाळी साडे दहा वा. राज्याचे कौशल्य
विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.संभाजी
पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते होईल.
या
कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक
उपक्रम मंत्री ना. अनंत गिते हे राहणार असून राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती
तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, आरोग्य, परिवहन, कामगार, राज्य उत्पादन शुल्क
राज्यमंत्री ना.विजय देशमुख, इमारत
व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव हे उपस्थित राहतील.
या कार्यक्रमास जिल्हा
परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, लोकसभा
सदस्य खा.श्रीरंग बारणे, विधान परिषद
सदस्य आ.जयंत पाटील,आ.निरंजन डावखरे,आ. बाळाराम पाटील, आ.अनिकेत तटकरे तसेच आ.सुरेश
लाड,कर्जत, आ.भरत गोगावले महाड, आ.धैर्यशील पाटील, पेण, आ.मनोहर भोईर उरण, आ.सुभाष
पाटील अलिबाग, आ.अवधूत तटकरे, पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल,
कामगार उद्योग,उर्जा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार (भा.प्र.से.), नवीमुंबई
पोलीस आयुक्त श्री.संजयकुमार(भा.प्र.से.), कामगार आयुक्त राजीव र.जाधव, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा
परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश
देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी
नोंदित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक किट व सुरक्षा किट वाटप होणार आहे. त्यासाठी कामगारांनी आपले टोकन व आधार कार्ड
सोबत आणावे. तसेच या साहेळ्यास
जिल्ह्यातील नोंदित बांधकाम कामगारांनी
सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार उप आयुक्त रायगड भ.मा.आंधळे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment