राज्यसेवा पूर्व परीक्षा-2019 अलिबाग येथील सहा उपकेंद्रावर बैठक व्यवस्था
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- महाराष्ट्र
लोकसेवा आयोग मुंबई यांच्यामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा-2019 ही परीक्षा
रविवार दि.17 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायं. 5 या वेळेत होणार
आहे. सदर परीक्षेची बैठक व्यवस्था अलिबाग शहरातील आर.सी.एफ.सेंकडरी ॲण्ड हायर
सेंकडरी हायस्कूल, जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय,पी.एन.पी.कला वाणिज्य व
विज्ञान महाविद्यालय अलिबाग, जा.र.ह.कन्याशाळा अलिबाग, जे.एस.एम.कॉलेज अलिबाग
(Part 1), जे.एस.एम.कॉलेज अलिबाग (Part 2) या उपकेंद्रावर करण्यात आली आहे.
आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये
गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस
कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. तसेच पर्यावेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी
पथकाची नियुक्ती करण्यात आले आहे.
परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार
आहेत. या संदर्भात परीक्षेसाठी येणाऱ्या
उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी
कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment