रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त पेण आरटीओ कार्यालयाचे विविध उपक्रम
अलिबाग,
जि. रायगड, दि.13 (जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण
तर्फे 30 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहास सोमवार दि.4 पासून प्रारंभ झाला असून सलग
पंधरा दिवस रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने वाहन चालक-मालकांसाठी तसेच शिकाऊ
व कायम लायसन्स मिळविण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी रस्ता सुरक्षा विषयक
व्याख्यान देण्यात येत आहे तसेच माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. या निमित्ताने रस्ता सुरक्षा विषयक नियमांची व
सुरक्षित वाहतुकीबाबतची माहिती वाहन धारकांना कार्यालयीन सहाय्यक मोटार वाहन
निरीक्षक श्रीमती अपर्णा चव्हाण या देत आहेत.
या उपक्रमाचा लाभ कार्यालयीन कामासाठी उपस्थित असलेले वाहनधारक तसचे शिकाऊ
व कायम लायन्सस मिळविण्यासाठी येणारे उमेदवार घेत आहेत. ही माहिती केवळ तोंडी न देता सोबत माहिती
पत्रकेसुध्दा देण्यात येत आहेत.सदर व्याख्यानामध्ये सुरक्षित रस्ता वाहतुकी
संदर्भातील नियम, वाहन चालविताना योग्यप्रकारे सिटबेल्टचा वापर, दुचाकी वाहन
धारकांसाठी हेल्मेटचा वापर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत तसेच वाहन चालविताना
मोबाईलचा वापर न करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये व्याख्याना सोबतच सुरक्षित
रस्ता वाहतुकी संदर्भातील ध्वनीचित्रफितही उपस्थित वाहन धारक तसचे शिकाऊ व कायम
लायन्सस मिळविण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी दाखविण्यात येत आहे, अशी माहिती उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी,पेण यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment