मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आज भूमिपुजन
अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका)- शासनाच्या राष्ट्रीय कृषी
विकास योजनेअंतर्गत अलिबाग येथील नियोजित मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे
भूमिपुजन शनिवार दि.16 रोजी दुपारी तीन वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार
आहे.
अलिबाग येथे कोळीवाडा परिसरात मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. या
कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग व
सार्वजनिक उपक्रम मंत्री आ. अनंत गिते, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,
मत्स्यव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर,
राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्नव नागरी पुरवठा,
ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, वस्त्रोद्योग,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री ना. अर्जून खोपकर, जिल्हा
परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, लोकसभा सदस्य खा. श्रीरंग बारणे, विधानपरिषद
सदस्य आ. जयंत पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे,
विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. धैर्यशील
पाटील, आ. मनोहर भोईर, आ. अवधूत तटकरे,
नगराध्यक्ष प्रशांत नाईक,
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे आदी मान्यवर
उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा शनिवार दि.16 रोजी दुपारी तीन वा. होणार असून
उपस्थितीचे आवाहन सह आयुक्त मत्स्यव्यवसाय
विनोद नाईक, कार्यकारी अभियंता आर.एस. मोरे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय
युवराज चौगले यांनी केले आहे.
00000
असे आहे मत्स्यव्यवसाय
प्रशिक्षण केंद्रः राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून
मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण
केंद्राची सुधारणा व बळकटीकरण करण्यासाठी 3 कोटी 77 लाख 90 हजार रुपये इतक्या
खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या इमारतीत मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण
केंद्र, अद्यावत मत्स्यालय,
संग्रहालय, वाचनालय व सभागृह,
प्रशिक्षणार्थींसाठी वसतीगृह तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचे कार्यालय असतील. या
कामाला तांत्रिक मान्यताही मिळाली असून एक कोटी रुपयांचा निधीही कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधका विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
प्रगत मच्छिमार तंत्राचा अवलंब करुन मत्स्योत्पादन वाढविण्याचे प्रशिक्षण
मच्छिमार युवकांना दिले जाते. राज्यात कोकण किनारपट्टीवरील सातपाटी, वसई(पालघर),
वर्सोवा(मुंबई), अलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधूदुर्ग) असे
सहा मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालवली जातात.रायगड जिल्ह्यातील
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र हे 1 जुलै 1965 पासून स्थापन करण्यात आले
आहे. प्रत्येक सत्रात 22 प्रशिक्षणार्थी
प्रशिक्षण घेत असतात. या केंद्रात सागरी
मत्स्य व्यवसाय, नौकानयन तसेच डिजेल इंजिन परिचालन व देखभाल याचे प्रशिक्षण दिले
जाते. या प्रशिक्षण केंद्राची ‘मत्स्यप्रबोधिनी’ ही मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण
नौकाही असून त्याचाही प्रशिक्षण देण्यासाठी वापर केला जातो.
00000
Comments
Post a Comment