सैनिकी मुलांच्या वसतिगृह अधिक्षक पदासाठी अर्ज मागविले


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 6- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग  कार्यालयाच्याअखत्यारित सैनिकी मुलांचे वसतिगृह महाड येथे  वसतिगृह अधिक्षक पदावर  एकत्रित मासिक मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करावयाची आहे.  यासाठी सैन्यातून  नायब सुभेदार व पुढील हुद्यावरुन निवृत्त झालेले माजी सैनिक, शैक्षणिक अर्हता एस.एस.सी. पास असलेल्या इच्छूक उमेदवारांनी आपल्या बायोडाटासह अर्ज करावेत. आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग येथे स्वहस्ते किंवा कार्यालयाचा  ई-मेल आयडी zswo_raigad@mahasainik.com  वर दि.15 फेब्रुवारी 2019 पुर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे अवाहन मेजर प्रांजळ  जाधव  (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. उशीरा प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज