डूबी- हातपाटीद्वारे रेती उत्खनन परवान्यासाठी अर्ज मागविले



अलिबाग,जि.रायगड, दि.18(जिमाका)-  जिल्ह्यातील  खाडी, नदी पात्राच्या तटीय क्षेत्रातील स्थानिक पारंपारिक पद्धतीने डूबी, हातपाटीद्वारे रेती उत्खनन व्यवसाय करणाऱ्यांना रेती उत्खनन  परवाना देण्यासाठी संबंधित व्यावसायिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
यासंदर्भात जिल्हा खनिकर्म शाखेकडून जारी केलेल्या सुचनेनुसार,  सागरी किनारपट्टी विनिमय क्षेत्रातून (सी.आर.झेड.) नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी वळू,रेती निर्गती धोरण निश्चित केले आहे.  त्यानुसार  पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या स्थानिक वक्तींना वा अशा व्यक्तींच्या संस्थांना  विनालिलाव पद्धतीने  रेती उत्खननाचे परवाने देण्यात येतात. सन 2018-19 करीता  महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांचेकडून रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी, बाणकोट नदी,  कुंडलिका नदी- रेवदंडा खाडी, अंबानदी, धरमतर खाडी, पाताळगंगा नदी, राजपुरी खाडी (मांदाड नदी) व काळ नदी या खाडी पात्रातील जल सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाले आहेत. या खादी नदी पात्रातून रेती उत्खनन परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.  या करीता मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम  बोर्ड, मुंबई यांच्या वतीने  जिल्ह्यातील संबंधित खाडी, नदी तटीय क्षेत्रातील  विहित अर्हता धारण करणाऱ्या पात्र स्थानिक डूबी, हातपाटी पद्धतीने रेती उत्खनन  व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  तरी जिल्ह्यातील डूबी, हातपाटी पद्धतीने रेती उत्खनन  व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी सदर परवाना मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करुन व शुल्क शासन जमा करुन विहित नमुन्यातील अर्ज  जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग, खनिकर्म शाखा यांच्याकडे सादर करावे. या साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी व विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय रायगड- अलिबाग खनिकर्म शाखेत उपलब्ध आहेत, असे अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी कळविले आहे. 
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक