पल्स पोलीओ लसीकरणःजिल्ह्यात रविवारी (10 मार्च) लसीकरणः 2 लाख 72 हजार बालकांना डोस देण्याचे नियोजन
अलिबाग,जि.
रायगड दि.5(जिमाका):- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण
मोहिमेअंतर्गत येत्या रविवार दि.10
रोजी रायगड जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण
मोहिम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील
2 लाख 72 हजार 748 बालकांना या मोहिमेत लसीकरण करण्यासाठी जिल्हा आरोग्य
यंत्रणा सज्ज झाली आहे.
आज
या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा
परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन
देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी,
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. काटकर आदी उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यंत्रणानिहाय पूर्वतयारीचा आढावा घेतला.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात
ग्रामिण व शहरी मिळून 2 लाख 72 हजार 748
अपेक्षित लाभार्थी आहेत. त्यासाऱ्यांना डोस पाजण्यासाठी ग्रामिण भागात 2925 तर शहरी
भागात 241 अशा एकूण 3166 बुथवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या लसीकरणासाठी 7224 आरोग्य कर्मचारी नेमण्यात
आले आहेत. या मोहिमेत शून्य ते 5 वर्षे
वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येईल. रेल्वेस्टेशन, बस स्थानके अशा ठिकाणीही
694 पथके नेमण्यात आली आहेत. तसेच 224
मोबाईल पथकेही तैनात करण्यात आले आहेत. शहरी भागातील गर्दीच्या वस्त्यात तसेच
झोपडपट्टी भागात विशेषत्वाने काळजीपूर्वक लसीकरण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी
डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
Comments
Post a Comment