रायगड जिल्ह्यातील मतदार याद्या अचूक व परिपूर्ण आवश्यक सर्व दुरुस्त्या पूर्ण-- उप जिल्हा निवडणूक अधिकारी




रायगड दि १५: जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या  मतदार यादीसंदर्भात आवश्यक त्या दुरुस्त्या व इतर बदल केले असून बिनचूक व परिपूर्ण यादी तयार केली आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली. मतदारांनी कोणत्याही प्रकारे संभ्रम ठेवू नये तसेच मार्गदर्शनासाठी हेल्प लाईन, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्कात राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
मतदार फोटो ओळखपत्रांचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून २२ हजार ५३९ दुबार नोंदणी मतदार वगळले  आहेत. एवढेच नव्हे तर ६५ हजार १०७ जणांच्या दुरुस्त्या झाल्या असून २३ हजार १३६ मृत मतदारांची नावे वगळली  आहेत.
जिल्ह्यात २६९३ मतदान केंद्रे असून सर्व ठिकाणी सुविधा पुरविण्यात येत असून त्यात दिव्यांग मतदारांचाही प्राधान्याने विचार केला आहे.
जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ च्या अंतिम यादीनुसार एकंदर २२ लाख २५९ मतदार असून  ११ लाख १९ हजार ७४३ पुरुष व १० लाख ८० हजार ५१३ महिला , आणि ३ तृतीय पंथी मतदार आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज