विद्यार्थी खेळाडूंच्या वाढीव गुणांकनासाठी प्रस्ताव मागविले
अलिबाग,जि. रायगड दि.5(जिमाका): शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक (इ.12 वी) परिक्षेस
प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग,राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर
प्राविण्यप्राप्त सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे वाढीव
गुण देण्यासंदर्भातील सुधारित कार्यपध्दतीस शासन मान्यता देण्यात आली आाहे. शासन निर्णयानुसार भारतीय शालेय खेळ महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण
पुरस्कृत खेळ, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित खेळाच्या राज्य
संघटना इ.आयोजित खेळ क्रीडा गुणांसाठी ग्राह्य असणार आहेत. एकविध खेळाच्या राज्य संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या
स्पर्धांचे अहवाल शासन निर्णयात नमूद कागदपत्रांच्या यादीनुसार परिपूर्ण असतील तरच
खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळण्याकरिता शिफारस करण्यात येईल.
एखादा खेळाडू विद्यार्थ्यांना क्लबकडून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा
स्पर्धेत केलेले प्रतिनिधीत्व अथवा संपादन केलेले प्राविण्य क्रीडा गुण सवलतीसाठी
अनुज्ञेय असणार नाही.
जिल्ह्यातील
एकविध खेळाच्या संघटनांनी शासन निर्णयातील परिशिष्ट 4 व परिशिष्ट 5 नुसार आवश्यक
कागदपत्रांची पूर्तता दि. 10 मार्च रोजी पर्यंत या कार्यालयास सादर करावा. जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक,
प्राचार्य यांनी आपल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील पात्र खेळाडू
विद्यार्थ्यांचे विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयात
सादर करावेत. उशिरा व अपूर्ण अहवालामुळे विद्यार्थी क्रीडा गुणांपासून वंचित राहिल्यास याची
जबाबदारी संबंधित संघटनेची असेल असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी
कळविले आहे.
Comments
Post a Comment