पोषण पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



 लिबाग, जि. रायगड, दि.8(जिमाका)- पोषण आहाराविषयी जनजागृती होऊन पोषणमुल्य असलेल्या आहाराबद्दल माहिती होऊन बालकांमधील कुपोषणाची समस्या दूर होण्यासाठी शुक्रवार दि.8 ते 22 मार्च दरम्यान  महिला बालविकास विभागाच्या वतीने  पोषण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आज येथे दिली.
               पोषण आहार पंधरवाड्याची माहिती देण्यासाठी आज जिल्हा परिषदेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुक्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक हे ही उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, या अभियानाचा उद्देश राज्य आणि जिल्हा पातळीवर पोषणासाठी जनजागृती करणे असा असून महिला व बाल विकास विभाग तसेच सामाजिक कल्याण तसेच इतर विभागांबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे. या अंतर्गत जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
               त्यानुसार, 8 मार्च  रोजी पोषण मेला, जनजागृतीसाठी पत्रकार परिषद आयोजित करुन माध्यमांना माहिती देणे,  शनिवार दि. 9 रोजी जिल्ह्यातील सर्व  पंचायत समितीस्तरावर बैठका घेणे, रविवार दि.10 रोजी सायकल रॅली, सोमवार दि. 11 रोजी  प्रत्येक शाळास्तरावर अॅनिमिया चाचणी शिबिरांचे आयोजन, मंगळवार दि. 12 रोजी पोषण जनजागृतीसाठी किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती अभियान, बुधवार दि. 13 रोजी सायकल रॅली, गुरुवार दि.14 रोजी युवा गट बैठक पोषण फेरी, शुक्रवार दि.15 रोजी किशोरावस्थेतील मुलींसाठी जागृती मोहिम , शनिवार दि. 16 रोजी शेतकरी क्लब बैठक  हाट बाजार उपक्रम, रविवार दि.17 रोजी पोषण वॉक, सोमवार दि.18 रोजी युवा वर्ग बैठक व शालेय स्तरावर कार्यक्रम, मंगळवार दि.19 रोजी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व जनजागृती, बुधवार दि.20 रोजी ॲनिमिया शिबिर, गुरुवार दि.21 रोजी सायकल रॅली, शुक्रवार दि.22 रोजी  पंचायत समितीस्तरावर आढावा. या शिवाय राज्य स्तरीय नियोजनानुसार, गृह भेटी, एसएचजी मीटिंग्स, मास मीडिया मोहिमे, नुक्कड नाटक आणि सामुदायिक रेडिओ. सोशल मीडिया कॅम्पेन इ. उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
               या उपक्रमांत समाजातील सर्व नागरिकांनी विशेषतः लहान बालकांच्या पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज