आपत्ती व्यवस्थापनः पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-  आगामी मॉन्सूनच्या पार्श्वभुमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या पूर्वतयारीचा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज  विभागनिहाय आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे,  उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, प्रतिमा पुदलवाड, विठ्ठल इनामदार, रविंद्र बोंबले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार आदी अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रात करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, संभाव्य पूरस्थिती निर्माण होणारी ठिकाणे, तेथील उपाययोजना, आरोग्य यंत्रणांची सज्जता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील वाहतूक कोंडींची संभाव्य ठिकाणे,कामे सुरु असल्याने वळविण्यात आलेले मार्ग, मत्स्य विकास विभागामार्फत समुद्र खवळलेल्या अवस्थेत मासेमारी बंद करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत जनजागृती यांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीस  सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पालकमंत्री महोदयांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा परिसरातील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड संदर्भातील समस्या, पेण तालुक्यातील पाणीटंचाईवरील उपाययोजना, रायगड जिल्ह्यातील अलिबाग-पेण-पनवेल परिसरातील आरोग्य विभागाशी संबंधित समस्या, पेण तालुक्यातील आदिवासी विभागातील विकास कामांबाबतचा आढावा घेतला.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज