किनारपट्टीलगत 14 पर्यंत सतर्कतेचा इशारा



अलिबाग, जि.रायगड, दि.11 (जिमाका) – अरबी समुद्रात लक्षदीप बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या वादळाचा केंद्रबिंदु लक्षदिप बेटाच्या उत्तर पश्चिम दिशेस 200 किमी दूर आहे. हे वादळ मुंबईपासून 840किमी दूर दक्षिण पिश्चिम दिशेने व गुजरातच्या दक्षिण पूर्व दिशेला वेरावल येथून 1020 किती अंतरावर जाणार आहे. वादळ दूर समुद्रात असले तरी या काळात समुद्र खवळलेल्या अवस्थेत राहणार आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी लगत सर्व जिल्ह्यात (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई) येत्या 14 तारखेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यता आला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच आगामी 72 तासात हे वादळ उत्तर पश्चिम दिशेला वळणार असल्याचे भाकीत वेधशाळेने वर्तविले आहे. त्या अनुषंगानेही सतर्कता व खबरदारी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज