राजर्षी शाहु महाराज जयंतीनिमित्त आजपासून (दि.26) विविध कार्यक्रम




             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि..26 पासून दि.25 जुलै पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.     या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यक्रम बुधवार दि.26 रोजी दु.3 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात होणार आहे, असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी रविकिरण पाटील यांनी सांगितले आहे.
यानिमित्ताने दि.26 जून ते 25 जुलै 2019 या एक महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात समता दिंडीचे आयोजन, शोभारथ देखावे व सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.  यामध्ये मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रदान करणे,अस्पृश्यता निर्मूलनार्थ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेडेगावांना पारितोषिक वितरण करणे, शाळा महाविद्यालयात निबंध, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करणे अशा कार्यक्रमाचा अंतर्भाव आहे, असेही कळविण्यात आले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट
            दि.26 जुलै 1874 जन्मगाव-यशवंरातराव, घराणे-घाटगे, जहागिरी-कागल, वडील-जयसिंगराव,आई-राधाबाई, लहान भाऊ-बापूरसाहेब.  17 मार्च 1884 दत्तक विधान,दत्तक नाव-शाहू, घराणे छत्रपती शिवाजी महाराज संस्थान कोल्हापूर.  1 जानेवारी 1891 विवाह-लक्ष्मीबाई, घराणे-खानविलकर,बडोदा.  2 एप्रिल 1894 राज्यरोहण कोल्हापूर संस्थानची सूत्रे घेतली.  1 जून 1895 सरसुभे म्हणून भास्करराव विठोजी जाधव (एम.ए.)यांची नेमणूक संस्थाच्या प्रशासनात झालेला महिला ब्राम्हणेत्तर व्हिक्टोरियाने छत्रपती शाहूंना G.C.S.I. हा किताब बहाल केला.  31 जुलै 1897 युवराज राजाराम यांचा जन्म. 15 एप्रिल 1899 दुसरा मुलगा शिवाजी यांचा जन्म. सन 1901 गोवध बंदीचा कायदा.  1901 ते 1920 कोल्हापुरात जातवार वसतिगृहाची स्थापना,  1919 गंगाराम यास सवर्ण वस्तीत हॉटेल काढून दिले,  1920 न्याय निवाड्यांचे एकत्रिकरण करुन हिंदू कायद्याने निर्बंध कोल्हापूरचा हिंदू कोड तयार केला.  6 मे 1921 निधन-पन्हाळा लॉज मुंबई येथे.
0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत