अपंगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24-अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ अपंगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आहे.   या संस्थेत सन 2019-20 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.
            प्रवेशासाठी नियम अटी व सवलती पुढीलप्रमाणे : सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर वुईथ एम.एस.ऑफीस (संगणक कोर्स) किमान इयत्ता आठवी पास.  मोटार ॲण्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रिक कोर्स)  इयत्ता नववी पास. एम.एस.सी.आय.टी. (संगणक कोर्स) :वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष,प्रशिक्षण कालावधी एक वर्ष.  फक्त अपंग मुलांनाच प्रवेश दिला जातो. 
        सोई व सलवती : प्रशिक्षण कालावधीत राहण्याची,जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय.  अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा.  भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण.  नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा.  अनुभवी व तज्ज्ञ निदेशक.  उज्वल यशाची पंरपरा.  समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.
            प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक,शासकीय प्रौढ  अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळीरोड, म्हेत्रे मळा,गोदड मळ्याजवळ मिरज ता.मिरज, ता.सांगली-416410 (दूरध्वनी क्र.0233-2222908) मो.9922577561/9975375557  या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील.   संपूर्ण भरलेले प्रवेश अर्ज संस्थेकडे 31 जुलै पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावे असे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या  अधिक्षकांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज