नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनांसाठी प्रस्तावाबाबत



अलिबाग,जि.रायगड दि.25-(जिमाका) नाविन्यपूर्ण योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती या प्रवर्गातील 18 वर्षावरील अर्जदारांकडून (दुधाळ गाई/म्हशीचे गट वाटप करणे,शेळी/मेंढी गट वाटप करणे,मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे) दि.25 जुलै 2019 ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.   योजनेची पूर्ण माहिती व अर्ज करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशिल   https.//ah.mahabms.com, या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअर वरील AH MAHABMS या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे.  अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील.  अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये.  अर्जदाराची प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यात येईल.
  तरी इच्छुक अर्जदारांनी आपला  अर्ज प्रस्ताव विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने करावा व अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज