आपदग्रस्त शेतकऱ्यांनी आपला बँकेचा अकाऊंट नंबर कळविणेबाबत



अलिबाग,जि.रायगड दि.25-(जिमाका) अलिबाग तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे सन 2017-18 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीचे नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याकरिता शासनाकडून अनुदान प्राप्त झालेले आहे.  मात्र बऱ्याच आपदग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांचे बँकेचे अकाऊंट नंबर संबंधित तलाठी ,ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांचेकडे दिलेले नसल्याने नुकसान भरपाईची रक्कम बँकेमध्ये जमा करता येत नाही.  यासाठी अलिबाग तालुक्यातील सन 2017-18 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांनी आपला बँकेचा अकाऊंट नंबर अथवा पासबुकची छायांकीत प्रत संबंधित तलाठी ,ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांच्याकडे पाच दिवसात जमा करावी. मुदतीत बँकेचा अकाऊंट नंबर अथवा पासबुकची छायांकीत प्रत जमा न केल्यास नुकसान भरपाईपोटी प्राप्त झालेले अनुदान शासनास जमा करावे लागेल.याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असे आवाहन तहसिलदार अलिबाग सचिन शेजाळ यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज