जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त रॅलीचे उद्घाटन




अलिबाग, जि. रायगड, दि.02 (जिमाका)-  जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त आयोजित रॅलीचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संदीप वीरभद्र स्वामी, अध्यक्ष लायन्स क्लब श्रीबाग  अंकित बंगेरा व  चित्रलेखा पाटील,  निहा राऊत  लायन्स क्लब श्रीबाग,  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग संजय माने यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
 रॅलीच्या सुरुवातीला  जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत आयोजित सेल्फी पॉईन्टचे उदघाटन वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले
रॅलीची सुरुवात  जिल्हा सामान्य रुग्णालयतील प्रांगणामध्ये होऊन सदरची रॅली एस.टी. स्टॅन्ड, शिवाजी पुतळा, बालाजी नाका या मार्गे पुन्हा  जिल्हा सामान्य रुग्णालय  पर्यंत घेण्यात आली.   रॅलीमध्ये उपस्थित युवक युवतींना एचआयव्ही/एड्स विषयी शपथ देण्यात आली.    या रॅलीमध्ये नर्सिंग स्कुल,  जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, जे.एस.एम. कॉलेज अलिबाग, पी.एन.पी. कॉलेज वेश्वी अलिबाग तसेच लायन्स क्लब श्रीबाग यांचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. 
ही रॅली यशस्वी होण्यासाठी गिरीश म्हात्रे, गौरी म्हात्रे, हर्षद घरत, नेहा घरत, संतोष साखरे, बाबासाहेब चौगुले, कला पाटील, वैशाली बंगेरा, डॉ. स्मिता पाटील, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दिपक गोसावी,  वरिष्ठ वैधकीय अधिकारी डॉ. पांडुरंग शिंदे, वैद्यकीय अधिकारी एआरटी अलिबाग, डॉ. नालंदा पवनारकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश  देवकर,  प्राचार्या नर्सिंग प्रशिक्षण केंद्र अलिबाग श्रीम. मोरे,  जिल्हा पर्यवेक्षक नवनाथ लबडे,  जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम,  जिल्हा सहाय्यक रश्मी सुंकले  एम.अँड इ., श्रीम. संपदा मळेकर,  जिल्हा सहाय्यक कार्यक्रम, श्रीम.अर्चना जाधव, श्रीम.कल्पना गाडे,  अनिल खंडाळे, समुपदेशक, सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, गणेश सुतार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार, वाहनचालक महेश घाडगे, किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील, संकेत घरत यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  रक्तसंक्रमण अधिकारी, रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग   डॉ. दिपक गोसावी यांनी केले.  यावेळी  जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील एआरटी केंद्र, रक्तपेढी, आयसीटीसी, एसटीआय/आरटीआय विभागातील अधिकारी व कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक