छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम
अलिबाग दि.07, भारत निवडणूक
आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष
संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात
आयोगाने खालील प्रमाणे सविस्तर सूचना दिल्या आहेत.
पुन:रिक्षण कार्यक्रमाचे
टप्पे :-
1) पूर्व-पुनरिक्षण कार्यक्रम मतदार पडताळणी कार्यक्रम
(EVP) कॅम्पेन मोडमध्ये SVEEP च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण
सारख्या पुर्व-पुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे कालावधी दि.11 नोव्हेंबर, 2019 (सोमवार)
ते 20 डिसेंबर, 2019 (शुक्रवार).
पुनरिक्षण कार्यक्रम
:-
2) इंटीग्रेड प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी- सोमवार
दि.30 डिसेंबर 2019
3) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी- सोमवार दि.30 डिसेंबर
2019 ते गुरुवार दि.30 जानेवारी 2020 पर्यंत
पुन:रिक्षण कार्यक्रमाचे
टप्पे :-
4) विशेष मोहिमांचा कालावधी :- शनिवार दि.4 जानेवारी
2019 व रविवार दि. 5 जानेवारी 2020 शनिवार
दि. 11 जानेवारी 2019 व रविवार दि. 12 जानेवारी 2020
5) दावे व हरकती निकालात काढणे :- सोमवार दि. 10 फेब्रुवारी
2020 पूर्वी
6) प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार
यादीच्या अंतिम प्रसिध्दी करीता आयोगाची परवानगी घेणे- गुरुवार दि. 20 फेब्रुवारी
2020 पूर्वी.
7) डाटाबेस अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई इत्यादी
:- बुधवार दि.26 फेब्रुवारी 2020 पूर्वी
8) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी :- सोमवार दि.02 मार्च
2020
00000
Comments
Post a Comment