जिल्हास्तरीय कार्यान्वयीन यंत्रणांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम



अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)-जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकरिता राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या (जिल्हा वार्षिक योजना, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम,आमदार स्थानिक विकास कार्यक्रम,डोंगरी विभाग विकास कार्यक्रम,मानव विकास कार्यक्रम व इतर कार्यक्रम) प्रशासकीय मान्यता, निधी वितरण,कामांचे सनियंत्रण व प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच सर्व दस्ताऐवज संगणकीकृत करुन कागदरहीत कामकाज करण्यासाठी iPAS ( Integreated Planning Office Automation System) ही वेब वेस्ड संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.  नियोजन विभागाच्या दि.18/09/2019 च्या शासन निर्णयान्वये iPAS प्रणाली राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचे काम  ई.एस.डी.एस.सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा.लि.नाशिक या कंपनीमार्फत करण्यात येणार असून सदर प्रणालीचे रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय कार्यान्वयीन यंत्रणांकरिता प्रशिक्षण मंगळवार दि.17 डिसेंबर व बुधवार दि.18 डिसेंबर 2019 रोजी नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड-अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. 
            या प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रम मंगळवार दि.17 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा.मा.जिल्हाधिकारी रायगड यांच्याहस्ते व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड आणि उप आयुक्त (नियोजन) विभागीय आयुक्त  कार्यालय,कोकण विभाग नवी मुंबई यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज