दि.01 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर
कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या !
अलिबाग,
जि. रायगड, दि.17 (जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 16 एप्रिल 2020
दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल
जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे-
एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve
नागरिकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार
589. निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले
नागरिक- 1 हजार 801, घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) असलेले नागरिक-754,
शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले नागरीक-0. मयत
नागरिकांची संख्या-01, सद्य:स्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या-33 (पनवेल मनपा-26,
पनवेल तालुका-4,उरण तालुका-2, श्रीवर्धन-1), मुंबई फोर्टीज हॉस्पिटल, मुलूंड येथे
विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून त्याची तब्येतीची स्थिती गंभीर आहे.
उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक 24 असून यातील
सर्व दाखल रुग्णांची तब्येतीची स्थिती उत्तम आहे. नवी मुंबई महानगरपालिका
रुग्णालय, वाशी येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या नागरिकांची संख्या-01 असून या नागरिकाच्या
तब्येतीची स्थिती गंभीर आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई येथे विलगीकरण कक्षात
दाखल असलेले नागरीक-03 असून दाखल रुग्णांच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे.
जोगेश्वरी मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक-01 असून
दाखल रुग्णांच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. भाभा रूग्णालय, मुंबई येथील
विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरिक 01 असून रुग्णाच्या तब्येतीची स्थिती उत्तम
आहे. अपोलो रुग्णालय बेलापूर येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरिक 1 असून
त्याची तब्येत गंभीर आहे. सायन रुग्णालय मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले
नागरिक 1 असून त्याची तब्येत उत्तमआहे.
नागरिकांच्या SWAB
तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई
येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-413, कस्तुरबा गांधी
रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात
आलेल्या नागरिकांची संख्या-36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-377,
तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-329, तपासणीअंती
रिपोर्ट
मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या-10, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी
अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-38, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve
असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-33, ‘+’ ve रिपोर्ट असलेले
उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-04, मयत नागरिकांची संख्या-01, अशी माहिती जिल्हा
प्रशासनाने कळविली आहे.
0000
Comments
Post a Comment