कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 17 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर
अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 17 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना
संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
सद्य:स्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या-38
(पनवेल मनपा-28, पनवेल तालुका-5,उरण तालुका-3, श्रीवर्धन-1, पोलादपूर-1), मुंबई
फोर्टीज हॉस्पिटल, मुलूंड येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून त्याची तब्येतीची स्थिती गंभीर आहे. उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे
विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक 24 असून यातील सर्व दाखल रुग्णांची तब्येतीची
स्थिती उत्तम आहे. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय, वाशी येथे विलगीकरण कक्षात
दाखल असलेल्या नागरिकांची संख्या-02 असून या एका
नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम असून दुसऱ्या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती
गंभीर आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले
नागरीक-03 असून दाखल रुग्णांच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. जोगेश्वरी मुंबई
येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक-01 असून दाखल रुग्णांच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. भाभा
रूग्णालय, मुंबई येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरिक 01 असून रुग्णाच्या
तब्येतीची स्थिती उत्तम आहे. अपोलो रुग्णालय बेलापूर येथे विलगीकरण कक्षात दाखल
असलेले नागरिक 1 असून त्याची तब्येत गंभीर आहे. सायन रुग्णालय मुंबई येथे विलगीकरण
कक्षात दाखल असलेले नागरिक 1 असून त्याची तब्येत उत्तम आहे. कस्तुरबा रुग्णालय
मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक नागरिक 01 असून रुग्णाच्या
तब्येतीची स्थिती उत्तम आहे. जगजीवन रुग्णालय मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल
असलेले नागरिक 01 असून रुग्णाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. डी.वाय. पाटील
रुग्णालय नवी मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरिक 01 असून रुग्णाच्या
तब्येतीची स्थिती उत्तम आहे. एमजीएम रुग्णालय कामोठे येथे विलगीकरण कक्षात दाखल
असलेले नागरिक 01 असून रुग्णाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे.
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे
तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-428, कस्तुरबा गांधी रुग्णालय,
मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या
नागरिकांची संख्या-36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-392, तपासणीअंती
‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-331, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या
नागरिकांची संख्या-17, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त
नागरिकांची संख्या-44, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-38, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले
नागरिक संख्या-05 (पनवेल मनपा-5 ), मयत नागरिकांची संख्या-01, अशी माहिती जिल्हा
प्रशासनाने कळविली आहे.
0000
Comments
Post a Comment