पनवेल तालुक्यातील मौजे कोप्रोली येथील ग्रीन हेवन गृहननिर्माण संस्था वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून
अलिबाग, जि. रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे कोप्रोली येथील ग्रीन हेवन गृहनिर्माण संस्था, ई-विंग, ही
इमारत व त्याच्या आजूबाजूचा परिसर एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव
टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित
क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते.
मात्र आता Containment Zone (करोना विषाणू बाधित
क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या क्षेत्राचा कालावधीला दि.30 मे 2020 रोजी 28 दिवस
पूर्ण झाले असून या कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आलेला
नाही .
त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना
विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती
निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
०००००
Comments
Post a Comment