पनवेल तालुक्यातील मौजे वावेघर, पो.रसायनी Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित
अलिबाग,जि.रायगड, दि.04 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल
तालुक्यातील मौजे वावेघर, पो.रसायनी येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून
आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे वावेघर, पो.रसायनी
ता.पनवेल येथील पांडूरंग नारायण पाटील यांचे घर, पूर्वेस बाळकृष्ण पांडूरंग माळी
यांचे घर, पश्चिमेस निलेश शंकर चव्हाण यांचे घर, दक्षिणेस संतोष कोंडीराम माळी
यांचे घर व उत्तरेस प्रमिला पांडूरंग माळी यांचे घर हे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव
टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून
घोषित करण्यात आले आहे.
या परिसरात राहणाऱ्या
नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून
येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा
अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड
श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन
करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा
जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment