लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व इतर कामकाज 27 जुलै पासून होणार सुरु



अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी रायगड व उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पेण यांनी दि.15 ते 26 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती कामकाज, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज व इतर कामकाज स्थगित करण्यात आले होते. 
मात्र आता दि. 26 जुलै 2020 रोजी लॉकडाऊन संपत असल्यामुळे  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथील शिबीर कार्यालयातील कामे वगळता अनुज्ञप्ती जारी करणे, दुय्यम अनुज्ञप्ती देणे, अनुज्ञप्ती नुतनीकरण, पत्ता बदल, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे सुरु करण्यात करण्यात येणार आहेत.
या सर्व कामकाजाकरिता आगाऊ वेळ निर्धारण प्रणालीवर (अपॉईटमेंट) निर्धारित करणे आवश्यक राहील.  शिकाऊ अनुज्ञप्ती व ड्रायव्हिंग टेस्टसाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्क व हॅण्डग्लोव्हज घातलेले असतील तरेच अर्जदारांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. योग्यता प्रमाणत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले असेल तरच योग्यता प्रमाणपत्र विषयक चाचणी घेण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज