“पिक विमा उतरवा आपत्तीपासून सावरा”
अलिबाग, जि.रायगड (जिमाका) दि.01 :- शासनाने भात व नागली पिकासाठी पिक विमा योजना सुरु केलेली आहे. रायगड जिल्ह्याकरीता एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी नेमलेली आहे. भात पिकासाठी विमा संरक्षित एक एकर भात पिकासाठी रु.18 हजार 200/- असून विमा हप्ता रक्कम रु. 364/- म्हणजे प्रति गुंठयाला साधारणपणे रु. 10/- आहे. तसेच नागली या पिकासाठी विमा संरक्षित एक एकर नागली पिकासाठी रु. 8 हजार असून विम्याचा हप्ता रक्कम रु.160/- म्हणजे प्रति गुंठयाला साधारणपणे रु.4/- आहे. पावसातील खंड, पूर, दुष्काळ यामुळे शेतीचे नुकसान होऊन उत्पादन 50 टक्के पेक्षा कमी आल्यास विमा संरक्षण मिळते. विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख दि.31
जुलै
2020
आहे.
गेल्या वर्षी रायगड जिल्हयामध्ये एकूण 2 हजार 190 शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा
लाभ
मिळाला आहे. एक एकर भात पिक क्षेत्राला रु. 18 हजार एवढी रक्कम मिळाली आहे. या तुलनेत आपत्ती
अर्थसहाय्य फक्त रु.3 हजार 200 एवढेच मिळालेले
आहे. त्यामुळे पिक विमा उतरविणे फायद्याचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक पांडूरंग शेळके यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment