एन.सी.आर.एम.पी. योजनेंतर्गत भूमिगत वीज वितरण वाहिनीच्या मंजूरीसाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी घेतली ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट
अलिबाग,जि.रायगड, दि.02 (जिमाका) :- निसर्ग चक्रीवादळाने
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा दिला होता. या वादळात विद्युत खांबांचे प्रचंड
नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने युध्द
पातळीवर काम करून बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत केला असून उर्वरीत ठिकाणी वीजपुरवठा
लवकरच सुरू होईल.
अलिबाग येथे
नॅशनल सायक्लॉन रिस्क मिटीगेशन प्रोजेक्ट (एन.सी.आर.एम.पी.) अंतर्गत भूमिगत वाहिनीनुसार
वीज वितरण व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन
शहर व लगतचा भाग, मुरूड शहर व लगतचा भाग, उरण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर
व लगतचा भाग, त्याचप्रमाणे गुहागर शहर व लगतचा भाग येथे एन.सी.आर.एम.पी. योजनेंतर्गत
भूमिगत वीज वितरण वाहिनी टाकण्याचे काम मंजूर होणेबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी
राज्याचे ऊर्जा मंत्री श्री. नितीन राऊत यांची मंत्रालयात भेट घेवून विनंती केली. तसेच
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांचीही
भेट घेऊन त्यांना एन.सी.आर.एम.पी. योजनेंतर्गत भूमिगत वीज वितरण वाहिनी टाकण्याचे काम
मंजूर होणेबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.
००००
Comments
Post a Comment