कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित
वृत्त
क्रमांक :- 904
दिनांक :-02 जुलै 2020
अलिबाग,जि.रायगड, दि.02 (जिमाका) : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील विविध
ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती
आढळून आल्या आहेत, ती करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती
पुढीलप्रमाणे आहेत :-
मौजे कर्जत, ता.कर्जत येथील अमिरा पॅलेस, दुसरा
मजला.
मौजे कर्जत येथील आनंद नगर, ए विंग, तळमजला.
मौजे पाली ता.कर्जत येथील घर व घराच्या आजूबाजूचा
परिसर, उत्तर सचिन धर्मा गायकर यांचे घरापर्यंत, दक्षिणेस पाली गाव ते पाली
वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत, पूर्वेस पाली गाव अंतर्गत रस्त्यापर्यंत,
पश्चिमेस मधूकर हरिभाऊ गायकर यांच्या घरापर्यंत.
मौजे देऊळवाडी ता.कर्जत येथील घर व घराच्या
आजूबाजूचा परिसर, उत्तर-संजय बागा इतकर यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-महेंद्र देशमुख
यांचे घरापर्यंत, पूर्वेस-शैला दिवेकर यांचे घरापर्यंत, पश्चिमेस-हरिश्चंद्र ध्वनी
यांचे घरापर्यंत.
मौजे वाकस ता.कर्जत येथील घर व घराच्या आजूबाजूचा
परिसर, उत्तर-बुधाजी वाळकु शेकटे यांचे घरापर्यंत, दक्षिणेस- मोकळी जागापर्यंत,
पूर्वेस- मोकळी जागापर्यंत, पश्चिमेस- मोकळी जागापर्यंत.
मौजे वंजारपाडा ता.कर्जत येथील घर व घराच्या
आजूबाजूचा परिसर, उत्तर-अमर मिसाळ यांचे रुमपर्यंत, दक्षिणेस-साई मंदिर ते मारुती
टोकरे यांचे घरापर्यंत, पूर्वेस-माळरान शेतीपर्यंत, पश्चिमेस-माळरान पर्यंत.
मौजे डिकसळ ता.कर्जत येथील घर व घराच्या आजूबाजूचा
परिसर, उत्तर-सुनिल बापू शेलके यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-महेंद्र शिवाजी शेलके
यांचे घरापर्यंत, पूर्वेस-कृष्ण बाबू शेलके यांचे घरापर्यंत, पश्चिमेस-शशिकांत
शेलके यांचे हॉटेल ते कर्जत नेरळ मेन रोड पर्यंत.
मौजे नेरळ ता.कर्जत येथील घर व घराच्या आजूबाजूचा
परिसर, उत्तर-अशोक जाधव यांचे घर ते विमल पार्क पर्यंत, दक्षिणेस-मंगेश सदावर्ते
यांचे घर ते विशाल गायकवाड यांचे घरापर्यंत, पूर्वेस-सुनिल जाधव यांचे घर ते
बाबासाहेब सभागृहापर्यंत, पश्चिमेस-साईधाम बिल्डिंग ते कृष्ण कोळी
इमारतपर्यंत.
मौजे बोरवाडी ता.कर्जत येथील घर व घराच्या आजूबाजूचा
परिसर, उत्तर-मोकळी जागेपर्यंत, दक्षिणेस-हॉटेल नमककडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत,
पूर्वेस-पनवेल-कर्जत रेल्वे लाईनपर्यंत, पश्चिमेस-देऊळवाडी मंदिर रस्त्यापर्यंत.
मौजे अवसरे ता.कर्जत येथील घरापासून
उत्तरेस-चंद्राकांत नारायण चव्हाण यांचे घर ते संजय मधुकर चव्हाण यांचे घरापर्यंत,
दक्षिणेस-जनार्दन नागो गायकर यांचे घर ते हरेश्वर विकास गायकर यांचे घरापर्यंत,
पूर्वेस-शरद दत्तू गायकर यांचे घर ते रमेश नारायण यांचे घरापर्यंत, पश्चिमेस-सुरेश
चांगो कालेकर यांचे घर ते भरत राघो भगत यांचे घरापर्यंत.
मौजे मुर्दे
ता.कर्जत येथील घरापासून उत्तरेस-वसंत अपार्टमेंट पर्यंत, दक्षिणेस- आवास
अपार्टमेंट पर्यंत, पूर्वेस-विलास मिसाळ यांचे घर ते धनंजय दुर्गे यांचे
घरापर्यंत, पश्चिमेस-खुली जागापर्यंत.
मौजे ममदापूर ता.कर्जत येथील घरापासून उत्तरेस-बाबा
पालटे यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-गुलजार
पालटे यांचे घरापर्यंत, पूर्वेस-ठाणगे यांचे घर ते रास्तभाव दुकानापर्यंत,
पश्चिमेस-पुंडलिक शिनारे यांचे घरापर्यंत.
मौजे नेरळ ता.कर्जत येथील घरापासून उत्तरेस- कर्जत
ते कल्याण रस्तापर्यंत, दक्षिणेस-नेरळ बाजारपेठ ते मारुती मंदिरपर्यंत,
पूर्वेस-डॉ.सरोदे यांचे दवाखाना पर्यंत, पश्चिमेस-हेटकर आळी ते साई मंदिर रस्ता पर्यंत.
मौजे दहिवली तर्फे निड, ता.कर्जत येथील घरापासून
उत्तरेस-कुमार मेढी यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-श्री कलावती आई मंदिरा पर्यंत,
पूर्वेस-श्री साई बंधन अपार्टमेंट इमारत पर्यंत, पश्चिमेस-पुरंदरे व त्यालगत श्री
विठ्ठल मंदिारापर्यंत.
मौजे झेंडेवाडी कोदिवले, ता.कर्जत येथील घरापासून
उत्तरेस-रस्ता, दक्षिणेस-चंद्रकांत मेंगाळ
यांचे घरापर्यंत, पूर्वेस-किसन मेंगाळ यांचे घरापर्यंत, पश्चिमेस-रस्ता.
मौजे नेरळ खांडा, ता.कर्जत येथील घरापासून
उत्तरेस-मधुकर साळुंखे यांचे घरापासून ते मनोहर अहिरे यांचे घरापर्यंत,
दक्षिणेस-डॉ.हेमंत शेवाळे यांचे हॉस्पिटल पासून ते पंचरत्न सोसायटी पर्यंत,
पूर्वेस-भायजी यांचे घरापासून ते मधुकर सोनावळे यांचे घरापर्यंत, पश्चिमेस- हनुमान
मंदिर ते वाहनतळापर्यंत.
मौजे किरवली, ता.कर्जत येथील घरापासून उत्तरेस- महेंद्र
देशमुख यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-रस्त्यापर्यंत, पूर्वेस-अरविंद जैन यांचे
घरापर्यंत, पश्चिमेस-रस्त्यापर्यंत.
मौजे देऊळवाडी, ता.कर्जत येथील घरापासून उत्तरेस-ओपन
गार्डन पर्यंत, दक्षिणेस-रस्त्यापर्यंत, पूर्वेस-सिएरा 3 पर्यंत, पश्चिमेस-सिएरा 1
पर्यंत.
मौजे पोशिर, ता.कर्जत येथील घरापासून
उत्तरेस-काशिनाथ आगिवले यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-किसन आगिवले यांचे घर ते भाऊ
हाबळे यांचे घरापर्यंत, पूर्वेस-परशुराम शेकटे यांचे घरापासून ते दत्ता राणे यांचे
घरापर्यंत, पश्चिमेस- एकनाथ कोंडीलकर यांचे घरापर्यंत.
मौजे भडवळ, ता.कर्जत येथील घरापासून उत्तरेस-भातशेती
जागा पर्यंत, दक्षिणेस-भातशेती जागा पर्यंत, पूर्वेस-अनंता जामघरे यांचे घरापासून
ते गोविंद मिणमिने यांचे घरापर्यंत,
पश्चिमेस- गावदेवी मंदिर ते राजिप शाळा भडवळ पर्यंत.
मौजे दहिवली तर्फे निड,, ता.कर्जत येथील नंदनवन
सोसायटी, ए विंग, उत्तरेस-सोसायटीकडे जाणारा रस्ता पर्यंत, दक्षिणेस-खुली
जागापर्यंत, पूर्वेस-गीरीवन नंदनवन सोसायटीच्या उर्वरित इमारत पर्यंत, पश्चिमेस-
गीरीवन नंदनवन सोसायटीच्या उर्वरित इमारत पर्यंत.
मौजे किरवली, ता.कर्जत येथील घरापासून,
उत्तरेस-राहूल वैद्य यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-राजेश गुजराथी यांचे घरापर्यंत,
पूर्वेस-सुप्रिया सुरेश चिटणीस यांचे घरापर्यंत, पश्चिमेस- ज्योती रतीभान पाटील
यांचे घरापर्यंत.
मौजे मुद्रे खु., ता.कर्जत येथील तुलीप इमारतीमधील
रुग्णाचे घर,उत्तरेस-सोसायटी मधील इरत इमारत, दक्षिणेस-लागू रस्ता पर्यंत,
पूर्वेस-खुली जागा पर्यंत, पश्चिमेस- सोसायटी मधील इतर इमारतीपर्यंत.
मौजे भिसेगाव,, ता.कर्जत येथील रुग्णाचे घर, रस्ता
ते रा.जि.प.शाळापर्यंत, पश्चिमेस- मेजर पाटील चाळपर्यंत, पूर्वेस-राधे गॅलेझी ते
इमारातीचे नवीन बांधकामपर्यंत पश्चिमेस
लागू रस्ता पर्यंत.
मौजे कर्जत, ता.कर्जत येथील रुग्णाचे घर,उत्तरेस-वैशंपाईन
यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-गजानन अपार्टमेंट पर्यंत, पूर्वेस-दिवाणी न्यायाधीश
यांच्या बंगल्यापर्यंत, पश्चिमेस- रस्त्या पर्यंत.
मौजे शेलू, ता.कर्जत येथील रुग्णाचे
घर,उत्तरेस-सुनिल डांगरे यांचे घर ते अनंता डांगरे यांचे चाळपर्यंत, दक्षिणेस-भात
शेतीपर्यंत, पूर्वेस-एकनाथ मसणे यांचे घरापर्यंत, पश्चिमेस- गजानन पाटील यांचे चाळपर्यंत.
मौजे मुद्रे बु., ता.कर्जत येथील रुग्णाचे
घर,उत्तरेस-रेव्हेन्यू कॉलनी, दक्षिणेस-मुख्य रस्त्यापर्यंत, पूर्वेस-खुली
जागापर्यंत, पश्चिमेस- नेमीनाथ सोसायटी मधील नवीन इमारतपर्यंत.
मौजे कर्जत, ता.कर्जत येथील रुग्णाचे
घर,उत्तरेस-डॉ.सोणावळे यांचे दवाखान्यापर्यंत, दक्षिणेस- इमारतीस लागू
रस्त्यापर्यंत, पूर्वेस-अंतर्गत रस्त्यापर्यंत, पश्चिमेस- उगले हाईटस इमारतपर्यंत.
ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी
पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित
करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य
ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात
प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध
आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन
अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे
भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे
अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी
यांनी कळविले आहे.
००००
Comments
Post a Comment