महाड तालुक्यातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मदतकार्य वेगाने करण्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

अलिबाग, जि.रायगड,दि.25 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पूर्णपणे ढासळून असून मोठी दुर्घटना घडली.

        या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज पहाटे उपस्थित राहून तेथे सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासकीय यंत्रणांना वेगाने मदतकार्य करण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.

       यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे,जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज