नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी च्या नागपूर येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाड-अलिबाग आगाराकडून बस व्यवस्था*


           अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी ची परीक्षा रविवार, दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागातील महाड-अलिबाग आगाराकडून दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी प्रवासी मागणीनुसार बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

           तरी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी च्या परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांनी आगार व्यवस्थापक, महाड-अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन, रायगड विभाग, पेणच्या विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज