भ्रष्टाचार विरोधात जनजागृतीसाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.29, (जिमाका):- भ्रष्टाचार विरोधात जनजागृतीसाठी दि.27 ऑक्टोबर ते दि. 02 नोव्हेंबर 2020 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

घोषवाक्य :- लाच देणे व घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे, कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे, मग हक्कासाठी लाच का?,  योजना सरकारची आपल्या भल्यासाठी, मग लाच कशासाठी?, कष्ट तुमचे, हक्क तुमचा मग त्याकरिता लाच का?, भ्रष्टाचार टाळा, देश मजबूत करा, लाचेची नशा करते जीवनाची दुर्दशा, कायदेशीर व्यवहार, दूर ठेवी भ्रष्टाचार, भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार, करे लोकशाही सरकार, लाचखोरीला कंटाळलात ? कळवून  तर पहा, भ्रष्टाचार रोखणे तुमच्या हाती, तुम्ही भ्रष्टाचार रोखू शकता, योजना सरकारची आपल्या भल्यासाठी मग लाच कशा कशासाठी?

नागरिकांना भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064, व्हॉटस्अस क्र.9930997700, संकेतस्थळ-acbmaharashtra.gov.in, मोबाईल ॲप-www. Acbmaharashtra.net, ई-मेल-acbwebmail@mahapolice.gov.in, व्टिटर-@ABC_maharashtra, फेसबुक-www.facebook.com/maharashtraABC/ असा आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना  भ्रष्टाचारासंबंधी काही तक्रार असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो अधिकराव पोळ यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत