महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगटातील महिलांना बँक सखी होण्याची सूवर्णसंधी

 


      अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बँक सखी निवड ही स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना बँक संबंधित कामामध्ये योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी म्हणून उचललेले एक मोठे पाऊल असून त्यांना ही एक सूवर्णसंधी आहे.

      बचतगट समूहातील महिलांच्य बँक संबधित येणाऱ्या छोट्याछोट्या अडचणी दूर करून  त्यांची कामे सहजरित्या पार पाडणे, हा बँक सखी नियुक्तीमागील हेतू आहे.

      बँक सखी निवडीचे निकष-

1) शैक्षणिक पात्रता किमान 12 वी पास आहे.

2) वय किमान 18 ते 35 वर्ष असावे.

3) समूह/बचतगट सदस्य असावी.

4) SC/ST/VJ.NT/Minority/अपंग,इ.मा.व. इ.प्रवर्गातील महिलांना प्राधान्य असेल.

5) समूहाचे/बचतगटाचे लेखे/पुस्तक लिहिण्याचा अनुभव असावा.

6) महिला बँक शाखा सेवा कार्यक्षेत्रात राहणारी असावी.

7) चांगले संभाषण कौशल्य असावे.

8) कोणत्याही बँक कर्ज प्रकरणात थकबाकीदार नसावी.

    जबाबदारी व भूमिका-

1) बँक शाखेत समूहासाठी माहिती कक्ष सांभाळणे.

2) समूहाचे/संघाचे/समूहातील महिलांचे बँक खाते उघडणे.

3) समूहातील महिलांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करणे.

4) कर्ज प्रकरणासाठी मार्गदर्शन व पाठपुरावा करणे.

5) समूहांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा वेळोवेळी मागोवा घेणे.

6)  इतर आर्थिक समावेशन गतीविधी राबविणे.

7) कर्जासाठी सल्लामसलत व आर्थिक साक्षरतेसाठी काम करणे.

        बँक सखी पदाकरिता एकूण 30 गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविली जाणार असून यापैकी लेखी परीक्षा 20 गुणांची तर मुलाखत 10 गुणांची असेल.

   मानधन तपशील–

मासिक मानधन- रु.2 हजार 500/- (आठवड्यातील किमान 5 दिवस बँक शाखेत काम करणे बंधनकारक आहे.) महिना प्रवास भत्ता– रु.500/-,मानधन अदाकर्ता - DMMU/VO/CLF व बँक शाखा प्रबंधक यांच्या अनुमतीने बँक सखीचे मानधन धनादेशामार्फत करण्यात येईल.

            तरी ज्या बचतगटातील महिला बँक सखी म्हणून काम करण्यास इच्छुक असतील, त्यांनी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 5 दिवसांच्या आत आपले अर्ज आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसहित तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, कर्जत येथे सादर करावेत, असे आवाहन  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या कर्जत तालुका अभियान व्यवस्थापकांनी  यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज