दि.01 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत संयुक्त सक्रीय क्षयरोग शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान
अलिबाग,जि.रायगड दि. 27 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात दि.01 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये
संयुक्त सक्रीय क्षयरोग शोध मोहीम अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये आरोग्य
कर्मचारी, आशा व स्वयंसेवक घरोघरी भेटी देऊन घरातील व्यक्तीची तपासणी करणार आहेत.
कुष्ठरोगाची लक्षणे : शरीरावर फिकट/लालसर
बधीर चट्टा/चट्टे, मज्जातंतू जाड/दुखऱ्या होऊन हातापायास बधिरता येणे,चकाकणारी, तेलकट
व सुजलेली त्वचा, कानाच्या पाळया जाड होने,भुवयाचे केस विरळ होणे.
क्षयरोग लक्षणे : दोन आठवड्याहून
अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवडयाहून अधिक कालावधीचा ताप, वजनात घट, भूक लागणे, मानेवर
गाठी येणे.
अधिक माहितीसाठी
आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या आशा (स्त्री)
व स्वयंसेवक (पुरुष) यांना सहकार्य करावे, असे आवाहन मा.जिल्हाधिकारी रायगड, मा. मुख्य
कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) रायगड व जिल्हा
क्षयरोग अधिकारी रायगड यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment