हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनचे प्रस्ताव कंपनीकडे सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत
अलिबाग,जि.रायगड
दि.19 (जिमाका) :- प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक
विमा योजना आंबिया बहार 2020-21 मध्ये कोकणात आंबा व काजू पिकासाठी जिल्ह्याकरिता बजाज
अलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनी लि.पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.
नैसर्गिक आपत्ती
व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देवून नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी
ही याेजना सुरू करण्यात आली आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असून विमा हप्त्याचा
भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 5 टक्के असा मर्यादित आहे. या
योजनेंतर्गत विविध कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा
संरक्षण दिले जाईल.
आंबा फळपिकांसाठी
विमा संरक्षित रक्कम रु. 1 लाख 40 हजार, विमा
हप्ता दर प्रति हेक्टरी रु.7 हजार, समाविष्ट धोके अवेळी पाऊस-विमा संरक्षण कालावधी दि.1 डिसेंबर ते दि.15 मे , कमी तापमान-दि.1 जानेवारी
ते दि.15 मार्च, जास्त तापमान-दि.1 मार्च दि.15 मे, गारपीट- दि.1 फेब्रुवारी ते दि.31
मे.
काजू फळपिकांसाठी
विमा संरक्षित रक्कम रु. 1 लाख, विमा हप्ता दर प्रति हेक्टरी रु.5 हजार, समाविष्ट धोके
अवेळी पाऊस-विमा संरक्षण कालावधी दि.1 डिसेंबर
ते दि.31 मार्च, कमी तापमान-दि.1 डिसेंबर ते
दि.28 फेब्रुवारी, गारपीट-दि.1 जानेवारी ते दि.30 एप्रिल.
विमा प्रस्ताव
कंपनीकडे सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2020 असून आपले ई-सेवा केंद्र/बँक
यांच्यामार्फत हे अर्ज करावेत. ही योजना 2020-21 मध्ये जिल्हयातील तालुक्यांत समाविष्ट
असणाऱ्या महसूल मंडळात आंबा व काजू या फळपिकासाठी निर्धारित केलेल्या प्रमाणकानुसार
लागू करण्यात येणार आहे. शासन निर्णयात नमूद केलेल्या महसूल मंडळात केंद्र शासनाने
प्राधिकृत केलेल्या महावेद या प्रकल्पातंर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रावर नोंदवले
गेलेल्या हवामानाची आकडेवारी व फळपीकनिहाय प्रमाणके यांची सांगड घालून शेतकऱ्यांना
विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई परस्पर बँकेव्दारे अदा केली जाईल.
आंबिया बहारातील
हवामान धोक्याच्या सविस्तर माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ
www.krishi.maharastra.gov.in पहावे. तसेच ई-सेवा केंद्र व बँक स्तरावर माहिती उपलब्ध
करुन देण्याच्या सूचना विमा कंपनीस देण्यात आल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड-अलिबाग
यांनी कळविले आहे.
०००००००
Comments
Post a Comment