राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

 



अलिबाग,जि.रायगड, दि.27, (जिमाका):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समितीच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय राज्यघटना प्रास्ताविक वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग व अलिबाग वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी 2 वाजता "भारतीय राज्यघटनेची मूल्ये व तत्व" या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या विषयावर रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समितीच्यावतीने सुध्दा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संदीप स्वामी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक श्री आर.आर.पाटील, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी संविधान दिनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले तर अॅड. चौऊलकर यांनी भारतीय राज्यघटनेची मूल्ये व तत्वे याविषयी मार्गदर्शन केले.    

             कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती विभा प्र.इंगळे, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड-अलिबाग यांनी मार्गदर्शन केले व अध्यक्षीय समारोप केला.   

            त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 (26/11) च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.आभार प्रदर्शन  वरिष्ठ लिपिक श्रीमती जोशी यांनी केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज