रायगड जिल्हा परिषदेमध्ये स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांचे अभिवादन
अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- माजी पंतप्रधान
स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेमध्ये स्व. इंदिरा गांधी
यांच्या प्रतिमेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केले.
यावेळी
सहाय्यक लेखा अधिकारी संजीव मोरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची "मी गांभीर्यपूर्वक शपथ
घेतो/घेते की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ
करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन.मी अशीही प्रतिज्ञा करतो/करते की, मी कधीही हिंसाचाराचा
अवलंब करणार नाही.तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा
इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडण्याचा प्रयत्न
ठेवीन", अशी शपथ दिली.
या
कार्यक्रमास शिक्षण विभागाचे अधीक्षक गणेश गिते, सहाय्यक लेखाधिकारी समीर धर्माधिकारी,
कनिष्ठ सहाय्यक प्रशांत जुईकर, संवाद तज्ञ सुरेश पाटील, दत्तात्रय नाईक, देवेंद्र भगत,
आनंद जीवन आदी उपस्थित होते.
0000000
Comments
Post a Comment