जानेवारी-फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 2 नगरपरिषदा व 17 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 


अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :-  राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 2 नगरपरिषदा व 17 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, व पोलादपूर या नगरपंचायतीची मुदत दि.24 जानेवारी 2021 रोजी संपुष्टात येत आहे.

             प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना दि. 02 डिसेंबर 2020 रोजी संबधित नगरपंचायतीच्या व जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व वेबसाईट प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

             प्रभाग रचनेवर हरकती व सूचना स्विकारण्याचा कालावधी व हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्यांची पुढीलप्रमाणे नेमणूक करण्यात आलेली आहे:-

नगरपंचायतीचे नाव- खालापूर, हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव- श्री.गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, दिनांक- बुधवार दि.02  ते बुधवार दि.09 डिसेंबर 2020 , वेळ-सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15, हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-खालापूर नगरपंचायत, ता. खालापूर.

नगरपंचायतीचे नाव- माणगाव, हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव- श्री.राहुल इंगळे, मुख्याधिकारी, माणगाव, नगरपंचायत, दिनांक- बुधवार दि.02  ते बुधवार दि.09 डिसेंबर 2020 , वेळ-सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15, हरकती व सुचना स्विकारण्याचे ठिकाण-माणगाव नगरपंचायत ता. माणगाव.

नगरपंचायतीचे नाव-पोलादपूर, हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव-विराज लबडे, मुख्याधिकारी,  पोलादपूर नगरपंचायत, दिनांक-बुधवार दि.02  ते बुधवार दि.09 डिसेंबर 2020 , वेळ-सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15, हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-पोलादपूर नगर पंचायत, ता.पोलादपूर.

नगरपंचायतीचे नाव- म्हसळा, हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव- मनोज उकिर्डे, मुख्याधिकारी, म्हसळा नगरपंचायत, दिनांक-बुधवार दि.02  ते बुधवार दि.09 डिसेंबर 2020 , वेळ-सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15, हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-म्हसळा नगर पंचायत, ता.म्हसळा.

नगरपंचायतीचे नाव- तळा, हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव- श्रीमती माधुरी मडके, मुख्याधिकारी,  तळा नगरपंचायत, दिनांक-बुधवार दि.02  ते बुधवार दि.09 डिसेंबर 2020 , वेळ-सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15, हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-तळा नगर पंचायत, ता.तळा.

००००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक