ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागास वर्ग उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज करावेत-उपायुक्त विशाल नाईक

 


 

         अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

            ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी दि. 01 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी.

तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर परिपूर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमिट करावेत. तद्नंतर त्याची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपद्धतीने जिल्हाधिकांऱ्याच्यामार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावेत. जुन्या पद्धतीने हस्तलिखित स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड विशाल नाईक यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज